अमरावती, दि. २९ (महाराष्ट्र मंथन):- भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच जाहीर सभा पार पडलेली. या सभेसाठी आलेल्या महिलांना प्रत्येकी ३०० रूपये दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत अमरावतीच्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ दि. २४ एप्रिल रोजी झालेल्या सभेत पैसे देऊन लोकांना आणले गेले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. याचा एक व्हिडिओ देखील रोहीत पवार यांनी सोशल मीडिया एक्स वर शेअर केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी अमरावतीत भाजपच्या सभेत उपस्थिती लावण्यासाठी महिलांना पैशांचं वाटप केलं गेलं, सोशल मीडिया एक्स वर व्हिडिओ शेअर करत कमिशन खाणारी पार्टी म्हणजे भाजप अशी जोरदार टीकाही केली आहे. यांना सभेला पैसे देऊन रोजाने माणसं आणावे लागतात हे आता जगजाहीर आहे, पण या गरीब माणसांच्या पैशातूनही हे कसं कमिशन खातात ते या व्हिडिओत बघा.. आता एकच मिशन..ज्यांनी खाल्ली दलाली त्यांना पाठवू घरी!, असं रोहित पवार म्हणाले.
या व्हिडिओ मध्ये काही महिला सभेतून घरी जाताना. या महिलांना एक व्यक्ती येऊन पैसे मिळाले का? अशी विचारणा करतो. महिलांनी हो म्हटल्यानंतर तुम्हाला कमी पैसे मिळाल्याचे सांगून सदर व्यक्ती या महिलांकडून सर्व माहिती काढून घेतो. त्यात पैशांचे पाकीट देखील दिल्याचे दिसत आहे. या पाकीटात ३०० रूपये दिसत आहे. त्यावर सदर व्यक्ती दुसऱ्याने ७०० रूपये घेतल्याचे महिलांना सांगताना दिसत आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1783692451578019967
सदर ट्विटर ची लिंक वर दिलेली आहे त्यावर क्लिक करून आमदार रोहित पवार यांचे ट्विट पाहू शकता…!












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 1