पिंपरी, दि. १२ (महाराष्ट्र मंथन):- जागतिक मातृदिनानिमित्त दापोडी येथे डॉ. गोयल हाॅलमध्ये स्री शक्ती जागरण मंच व मुकुंद प्रकाशन संस्थेच्या वतीने जागतिक मातृदिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत सोनवणे सुनिता आडसुळे यांच्या हस्ते मुक्ताबाई जवळकर, सुरवंता भातांबरेकर हौसाबाई वाखारे, सुवर्णा भालेकर, रंजना मोरे, लिलाबाई आकले संगीता वाव्हळ, फामीदा शेख, वर्षा शिंदे यांना “आई” पुरस्कार देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक चंद्रकांत सोनवणे यांनी भुषविले तर सूत्रसंचालन निलिमा सोनवणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन हेमा क्षिरसागर यांनी मानले. या कार्यक्रमास संजय स्टेफन यांच्यासह दापोडी परिसरातील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 194