पुणे, दि. २५ (माहाराष्ट्र मंथन):- राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो, कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत, असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार, अशा शब्दांत आमदार रविंद्र धंगेकर यांनी कठोर टीका करीत आजपासून दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवण्याची मालिका त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सुरू केली आहे.
त्यामध्ये त्यांनी आजची पहिली कथा म्हणून मुंढवा पोलीस स्टेशन मधील निलेश पालवे आणि काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स, हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. सोबत त्यांनी एक फोटो जोडला आहे ज्यामध्ये हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.
पुणेकरांच्यावतीने त्यांनी पोलिस आयुक्तांना विनंती केली आहे, पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित न केल्यास ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील.
यामध्ये त्यांनी शेवटी नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन पुन्हा भेटण्याची ग्वाही पुणेकरांना दिली आहे.
त्यांच्या ट्विटचे लिंक खाली दिले आहेत.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर… pic.twitter.com/GP7uIC0JTk— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 24, 2024












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0