आकुर्डी, दि. २९ (महाराष्ट्र मंथन):- पुणे-मुंबई महामार्गावरील आकुर्डी जवळील सिग्नल हा पूर्णपणे नदुरुस्त झाला असून तो तुटून महामार्गावरून बाहेर पडण्याच्या मार्गावर अर्धवट वाकला असून केंव्हाही तुटून पडण्याची आणि महामार्ग असल्याने खूप मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून हीच अवस्था असूनही वाहतूक विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वाहतूक विभागाचे अधिकारी या जीवघेण्या सिग्नलमुळे अपघात होवून मोठ्या जीवित आणि वित्तहानि होण्याची वाट पाहत आहेत का, असा प्रश्न येथील नागरिकांमधून विचारला जात आहे. आणि जर यामुळे कोणाचा जीव गेला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर नोंदवला जाणार, असाही प्रश विचारलं जात आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 219