मक्का, दि. १९ (महाराष्ट्र मंथन):- इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लिम तेथे मृत्यू यावा अशी कामना करतो कारण हज यात्रेदरम्यान ज्या हाजीला मृत्यू येतो तो शहीद म्हणून गणला जातो अशी मुस्लिमांची धारणा आहे. येथील सध्याचे तापमान ५२ डिग्री सेल्सियसच्या जवळ पोहोचले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे हज यात्रेकरूंना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. उष्माघाताने आतापर्यंत ५५० हाजींचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी किमान ३२३ इजिप्शियन होते, त्यापैकी बहुतेकांचा उष्णतेशी संबंधित त्रासामुळे मृत्यू झाला. इजिप्तच्या ३२३ हज यात्रेकरूंपैकी एक वगळता सर्व उष्णतेमुळे मरण पावले, असे एका राजनयिकाने सांगितले.
रिपोर्टनुसार, मृतांमध्ये ३२३ नागरिक इजिप्शियन आहेत तर ६० जॉर्डनचे आहेत. याशिवाय इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे. २ अरब राजनयिकांनी एएफपीला सांगितले की बहुतेक मृत्यू उष्णतेमुळे झालेल्या आजारामुळे झाले आहेत. १७ जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये तापमान ५१.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हज यात्रा ही जगातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा आहे. प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हजला जायला हवे असे म्हटले जाते. त्यामुळे जगभरातील लाखो मुस्लीम हज यात्रेसाठी मक्केला जातात. यंदाही जगभरातून लाखो लोक हज यात्रेसाठी सौदी अरेबियात आले आहेत. परंतु, यंदाच्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे यात्रेकरूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0