पिंपरी, दि. १७ (महाराष्ट्र मंथन):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल २८ लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. अचानक झालेल्या या प्रवेशाबाबत पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की कदाचित ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला लागली उतरती कळा असेल किंवा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी “पुतण्यासाठी“ “काकां”नी दिलेला “मौका”ही असू शकेल!
यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार प्रशांत सपकाळ, मा. नगरसेविका सुलक्षणाताई शीलवंत, विशाल जाधव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग उपस्थित होते.
प्रवेश केलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे :
- माजी महापौर हणमंतरावजी भोसले, 2. माजी महापौर वैशालीताई घोडेकर, 3. माजी नगरसेवक पंकज भालेकर, 4. माजी नगरसेवक तानाजी खाडे, 5. माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, 6. रवी सोनवणे, 7. यश साने, 8. माजी नगरसेवक संजय नेवाळे, 9. माजी नगरसेवक वसंत बोराटे, 10. माजी नगरसेवक विजया तापकीर, 11. शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा. विरोधी पक्षनेते राहुल भोसले, 12. माजी नगरसेवक समीर मासुळकर, 13. माजी नगरसेवक गीता मंचरकर, 14. माजी नगरसेवक संजय वाबळे, 15. माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे, 16. माजी नगरसेविका शुभांगी ताई बोराडे, 17. माजी नगरसेविका विनया ताई तापकीर, 18. माजी नगरसेविका अनुराधा गोफने, 19. माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर, 20. युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, 21. शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे, 22. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, 23. माजी नगरसेवक शशिकीरण गवळी, 24. विशाल आहेर, 25. युवराज पवार कामगार आघाडी, 26. विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, 27. नंदूतात्या शिंदे, 28. शरद भालेकर.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 335












Users Today : 2
Users Yesterday : 3
Users This Month : 206
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today : 7
Total views : 59602
Who's Online : 0