“विरोधकांना मैदानात येऊन उत्तर द्या आणि त्यांना ठोकून काढा’ अशी भाषा वापरणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ‘देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यानंतर ही भाषा करून दाखवावी. त्यानंतर ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल”, असा जबरदस्त इशारा संजय राऊत यांनी फडणवीसांना दिला. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
अमित शहा यांनी पुण्यात एका सभेत बोलताना शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी अमित शहा यांचा खरपूस समाचार घेतला. ”जे वक्तव्य अमित शहा यांनी केलं आणि त्याच्यावर तिथे असलेल्या मराठी श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. मला त्या मराठी श्रोत्यांची कीव येते. इतकी लाचारी, इतका निर्लज्जपणा. गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो व महाराष्ट्राचा अभिमान असलेले शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य करून निघून जातो. ही त्यांच्या मनाच मराठी नेत्यांबद्दल असलेली द्वेष भावन आहे. त्या द्वेषाला फुटलेली ही उकळी आहे.
शरद पवारांवर ज्यांच्यामुळे भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले असे सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आता अमित शहा यांच्यासोबत मांडिला मांडी लावून बसतायत. शहांच्या बाजुला अशोक चव्हाण बसले होते त्यांच्यावर अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला. याच्यांच सरकारने शरद पवार यांना देशातला सर्वोच्च दुसरा नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला होता. नरेंद्र मोदी म्हणालेले की पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही राजकारणात. या सगळ्याचा अर्थ आहे की मोदी शहांमध्ये मतभेद झालेले दिसतायत, असे संजय राऊत म्हणाले.












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0