Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहे. जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.
- पहिल्या ते चौथ्या हफ्त्यापर्यंतची रक्कम महिलांना मिळाली आहे, अशीही माहिती सरकारच्या वतीनं सांगण्यात येते. दरम्यान, महिलांना पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा लागली आहे. तत्पूर्वी, महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारकडून महिलांना दिवाळीसाठी मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. पण दिवाळी बोनस नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
- लाडकी बहीण योजना एक महत्त्वाकांशी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच या योजनेचा उद्देश आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची रक्कम दिली जाते. लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियम पाळावे लागतात. वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे.
- https://youtube.com/@maharashtramanthan
- राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस देण्यात येणार आहे. दरमहा मिळणाऱ्या पैशांच्या व्यतिरिक्त हा दिवाळी बोनस असणार आहे. तसच काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील.
- कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील?
- * महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
- * त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
- * त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
- * ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
- * या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 64












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0