पिंपरी, दि. ३१ (महाराष्ट्र मंथन):- जिजामाता रुग्णालयात मानधनावरील कर्मचार्यांची बिले अदा करतांना कार्यरत नसलेल्या कर्मचा-याची नावे मानधनाची बिले काढुन माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२३ अखेरपर्यंत रू.२०,७४,६००/- एवढ्या रक्कमेचा आर्थिक अपहार केल्याप्रकरणी लिपिक श्री. पारधी दत्तात्रय विठ्ठल यांना सेवानिलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्याचे तसेच ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. संगिता टी तिरुमणी व डॉ. सुनिता श्रीरंग साळवे यांच्यावर लिपीक पारधी दत्तात्रय विठ्ठल यास अपहार करणेच्या अनुषंगाने सुकर परिस्थिती निर्माण करुन दिल्याचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांना दंडात्मक शास्ती कारवाई करण्याचे तसेच प्रस्तुत आदेशाची नोंद त्यांच्या सेवानोंद पुस्तकात घेण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांनी जारी केले.
संपूर्ण आदेश खालीलप्रमाणे (आदेश क्रमांक सामान्य प्रशासन विभाग, क्र. साप्रवि/०९/कावि/१०३८/२०२४)
ज्याअर्थी, डॉ. संगिता टी तिरुमणी व डॉ. सुनिता श्रीरंग साळवे, ह्या वैद्यकिय विभागातर्गत तालेरा व जिजामाता रुग्णालयामध्ये गट अ दर्जाच्या ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. प्रकरणी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचा-यांवर आर्थिक बाबीशी संबंधित सर्वबाबीवर नियंत्रण ठेवणेची जबाबदारी त्यांची होती. तथापी, त्यांचे कार्यकालावधीमध्ये जिजामाता रुग्णालयात मानधनावरील कर्मचार्यांची बिले अदा करतांना कार्यरत नसलेल्या कर्मचा-याची नावे मानधनाची बिले काढुन माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२३ अखेरपर्यंत रू.२०,७४,६००/- एवढ्या रक्कमेचा आर्थिक अपहार झाल्याची बाब विशेष लेखा परिक्षण अहवालानुसार निदर्शनास आलेली आहे. प्रकरणी अपहार करणारे लिपिक श्री. पारधी दत्तात्रय विठ्ठल यांना वाचले क्र. ३ चे आदेशान्वये सेवानिलंबित करुन त्यांची विभागीय चौकशी सुरु करणेत आलेली आहे.
आणि ज्याअर्थी, प्रस्तुत प्रकरणी एकूण किती रक्कमेचा अपहार झालेला आहे व आणखी कोण- कोणत्या अनियमितता झालेल्या आहेत याबाबत विशेष लेखापरिक्षण करणेबाबत दि-२७/०६/२०२३ अन्वये मुख्य लेखापरिक्षक, मुख्य लेखा परिक्षण यांना निर्देश देणेत आलेले होते. त्यानुसार वाचले क्र ४ अन्वये मुख्य लेखापरिक्षक, मुख्य लेखापरिक्षण विभाग यांनी प्रस्तुत प्रकरणी विशेष लेखा परिक्षण (Special Audit) करुन अहवाल सादर केलेला आहे. त्यामध्ये मानधनावरील कर्मचा-यांची बिले अदायगीमध्ये अफरातफ़र होवुन मनपाचे आर्थिक नुकसान झाल्याचे नमुद करुन आर्थिक बाबीबाबत व बिलांच्या अदायगीबाबत गंभीर ताषेरे ओढलेले आहे. यास्तव, डॉ. संगिता टी तिरुमणी व डॉ. सुनिता श्रीरंग साळवे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी यांना वाचले क्र. ५ अन्वये कारणे दाखवा नोटीसा बजाविणेत आलेल्या होत्या. प्रकरणी डॉ. संगिता टी तिरुमणी व डॉ. सुनिता श्रीरंग साळवे, यांनी वाचले क्र. ६ व ७ अन्वये सादर केलेले खुलासे वस्तुस्थितीला धरून नसल्याने संयुक्तीक नाहीत, आणि ज्याअर्थी, विशेष लेखापरिक्षण अहवालानुसार मानधनाचे नेमणुक आदेश तसेच हजेरीपत्रक नसतांनाही मानधन देयकामध्ये नाव समाविष्ट करून ई.सी.एस द्वारे रक्कम आहरीत केलेली आहे. आणि माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२३ या कालावधीमध्ये ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी तथा आहरण वितरण अधिकारी व नियंत्रित अधिकारी/रुग्णालय प्रमुख म्हणुन डॉ. संगिता टी तिरुमणी व डॉ. सुनिता श्रीरंग साळवे ह्या कार्यरत होत्या. त्यांनी नियंत्रित अधिकारी व रुग्णालय प्रमुख म्हणुन पर्यवेक्षकिय कामकाजामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा/हलगर्जीपणा केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यांनी श्री. दत्तात्रय विठ्ठल पारधी, लिपिक यांना अपहार करणेच्या अनुषंगाने सुकर परिस्थिती निर्माण करुन दिल्याचे दिसुन येत आहे डॉ. तिरुमणी यांचे पर्यवेक्षकीय कामकाजावर अक्षम्य दुर्लक्ष व आर्थिक बाबीवर प्रभावी असल्याचे व त्यांचेकडुन पर्यवेक्षकिय कामकाजामध्ये व नियंत्रणामध्ये कुचराई झाल्याची बाब स आहे. त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील ३(१) (एक) (दोन) (तीन) व (२) भंग केलेच्या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे.
त्याअर्थी, मी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रस्तुत आदेशान्वये, उदघृत गैरवर्तन प्रकरणी डॉ. संगिता टी तिरुमणी व डॉ. सुनिता श्रीरंग साळवे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी यांनी श्री. पारधी, लिपिक यांना आर्थिक अपहार करणेस पोषक व समर्थनीय कामकाज प्रणाली राबविणेत येवुन पर्यवेक्षकीय तथा रुग्णालय प्रमुख म्हणुन सोपविलेल्या कामकाजात कसुर करुन गंभीर स्वरुपाचा निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट होत आहे. यास्तव एक वेळची संधी म्हणुन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२) ड चे अर्थातर्गत तरतुदीनुसार डॉ. संगिता टी तिरुमणी व डॉ. सुनिता श्रीरंग साळवे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी यांचेविरुध्द कामकाजातील हलगर्जीपणास्तव र.रु ५००/- दंडात्मक शास्ती कारवाई करणेत येत आहे. सदरची रक्कम त्यांच्या नजीकच्या मासिक वेतनातून वसूल करावी, त्यांना समज देणेत येते की, यापुढे कार्यालयीन कर्तव्य बजावितांना कर्तव्य पालनामध्ये कसुर केल्यास अथवा नियमबाह्य कामकाज केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेविरूध्द यापेक्षा कडक शास्ती कारवाई करणेत येईल. प्रस्तुत आदेशाची नोंद त्यांच्या सेवानोंद पुस्तकात घेण्यात यावी.