बीड, दि. ४ (महाराष्ट मंथन):- काल गेवराईमध्ये मोठ्या गोवंश जनावरांचा बाजार भरला होता. या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे घेऊन व्यापारी व शेतकरी आले होते. बाजारामध्ये पाय फिरवण्यासाठी जागा नव्हती एवढी मोठी गर्दी झाली होती. परंतु मुस्लिम समाजाने आपण कायद्याप्रती जागरूक झाल्याचे उदाहरण दिले आणि कायद्याचे उल्लंघन करून एकाही गोवंश जनवरची खरेदी केली नाही आणि सपेशल त्याकडे पाठ फिरविली, कायद्याने ज्या जनावरांना परवानगी आहे त्याच लहान जनवारांकडे मुस्लिम बांधवांचा कल वाढलेला दिसतो. एकही मुस्लिम बांधवांनी त्या बाजारातून जनावरांची खरेदी केली नाही आणि याद्वारे मुस्लिम समाजाने कथित गोरक्षक यांच्या कथित गोसुरक्षा मोहिमेत आपणही त्यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला आहे. मुस्लिम समाजाच्या या भारतीय कायदयाप्रती जागरुकतेचे सर्व गोरक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.
