पिंपरी कॅम्पमधील वृक्ष कत्तलीवर उद्यान विभागाच्या शांततेमागे कोणते “अर्थ”कारण?

पिंपरी, दि. ९ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी कॅम्प शास्त्रीनगर, तलाठी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील कित्येक वर्षे जुने असलेले झाड एका व्यावसायिकांनी गेल्या अंदाजे १५ – २० दिवसापूर्वी रात्री मध्येच ओम साई इंटरप्राइजेस (गॅस – शेगडी मिक्सर भांडे दुरुस्ती) शॉप समोरील झाड मुळासकट नष्ट करून टाकलेले आहे. तेथील नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी तेथील प्रत्यक्ष घडलेल्या घटनेची पाहणी केली असता, तेथे असे दिसून आले की ते झाड पूर्ण मुळासकट कटरच्या साहाय्याने काढून टाकलेलं आहे. त्यामुळे सदर परिसरातील नगरिकांनी आणि कुदळे यांनी वृक्षतोड कायद्याप्रमाणे दोषींवर कारवाई व्हावी यांची मागणी केलेली आहे. तसेच सदर प्रकरणी उद्यान विभागाच्या शांततेमागील “अर्थ”कारण शोधून काढण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तेथे घटना घडली त्या शॉपजवळ गेल्यानंतर तेथील व्यावसायिकांनी झाडाचे राहिलेले मूळ (खोड) कापडी पोत टाकून झाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड कायदा नियमन १९६४ प्रमाणे दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वच पर्यावरण प्रेमी यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त यांच्याकडे करीत आहेत.

Leave a Comment

READ MORE