(शफिक शेख)
निगडी, दि. २१ (महाराष्ट्र मंथन):- रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप विद्यामंदिर रुपीनगर येथे 11वा जागतिक योगदिन उत्साहात साजरा झाला. मुख्याध्यापक संगीता नवले यांनी चौथीच्या मुलांना तर पहिली ते तिसरीच्या मुलांना वर्ग शिक्षकांनी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यार्थी शिक्षक सर्व मिळून 683 जणांनी सहभाग घेतला. शाळा समिती सभापती मा श्री मंगेश नेरकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 135