पिंपरी, दि. ३० (महाराष्ट्र मंथन):- महाराष्ट्र किक बॉक्सिंग मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा आज संत तुकाराम नगर येथील विरंगुळा केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडली.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्लब्समधून एकूण २३० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये आर्यन्स मार्शल आर्ट्स, संत तुकाराम नगर यांनी विजेतेपद पटकावले वारियर्स टायक्वांडो अकॅडमी, नवी सांगवी यांनी उपविजेतेपद, तर युनायटेड मार्शल आर्ट्स, काळेवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
पंच मंडळात परवेज शेख, जुई देशमुख, ऑस्ट्रिन रॉड्रिग्ज, तरुण पाटील, कार्तिक वाघ, आदित्य शिरसाठ, आदित्य अडागळे, अजिंक्य आडसूळ, ओम देशमुख, युवराज यांनी भूमिका बजावली. या स्पर्धेचे आयोजन संतोष म्हात्रे व नीलम म्हात्रे यांनी तर सूत्रसंचालन अभिषेक शॉ यांनी केले.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 26