पिंपरी, दि. १४ (महाराष्ट्र मंथन):- शिव शाहू फुले आंबेडकर विचार धारेवर काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक भ्याड हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन घेण्यात आले.
या आंदोलनांमध्ये राष्ट्रवादी युवक, मराठा सेवा संघ छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या भ्याड हल्ल्याचा निषेध करून सरकारने हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंबंधी मागणी केली गेली.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवर तसेच मराठा समाजावर झालेला असून असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. या हल्ल्यास सरकार जबाबदार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख संघटनेच्या नावात आहे हे कारण पुढे करत हल्ला करणार्या दीपक काटेवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये इम्रान शेख, मारुती भापकर. प्रियांका बारसे, देवेंद्र तायडे, धनाजी येळकर, प्रवीण कदम, सतीश काळे, अरुण पवार, सचिन निंबाळकर, जाधव सर, नकुल भोईर, नरेंद्र बनसोडे, विशाल जाधव, राजू खंडगळे, साकी गायकवाड, आश्रफ शैख, साकिब शेख, प्रशांत जाधव, उमेश उदागे, गणेश धावरे, दानिश अन्सारी आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
