सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आमदार शंकर जगताप यांनी आपल्या आमदारकी पदाचा मान राखला

(शफिक शेख)

       पिंपरी, दि. २० (महाराष्ट्र मंथन):- महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विविध लोकहिताचे विषय लावून धरत प्रभावी उपस्थिती नोंदवली. पंधरा बैठकींसाठी शंभर टक्के उपस्थित राहणाऱ्या मोजक्या आमदारांपैकी ते एक होते. प्रश्न विचारण्यापासून विधेयकांवरील चर्चेपर्यंत आणि ठोस सूचनांपासून औचित्याच्या मुद्द्यांपर्यंत त्यांनी दमदार कामगिरी बजावली. लक्षवेधी सूचना क्रमांक २४७३ अंतर्गत त्यांनी राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण महामंडळ’ स्थापनेसह पत्रकारांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा, शिष्यवृत्ती, किमान वेतन, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा सर्व पत्रकारांना मिळाव्यात यावर त्यांनी भर दिला.

        जगताप यांनी विचारलेले ११ तारांकित प्रश्न आणि १० लक्षवेधी सूचना प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील गंभीर प्रश्नांशी निगडित होत्या. यातून स्थानिक प्रश्नांना विधानसभेत स्थान मिळाल्याचे उदाहरण दिसते.

प्रमुख लक्षवेधी सूचना:

  1. पिंपरी-चिंचवड डीपीतील बेकायदेशीर रस्त्यांची आरक्षणे रद्द करणे
  2. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक समस्या
  3. मालेगावमध्ये ५००च्या बनावट नोटांशी संबंधित गुन्हेगारी कारवाई
  4. पत्रकार कल्याण महामंडळाची गरज
  5. मुळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई
  6. अन्नधान्य वितरण कार्यालयातील गैरकारभार
  7. धर्मादाय रुग्णालयातील सवलतींच्या योजनेची ऑनलाईन अंमलबजावणी
  8. अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत
  9. बनावट पॅथॉलॉजी लॅब्सवर कारवाई आणि दर नियंत्रण कायदा
  10. शिक्षण विभागातील अपात्र शिक्षकांच्या वेतन घोटाळ्याची I.T. चौकशी
  11. ओला-उबेरसारख्या सेवा कंपन्यांच्या नियंत्रणासाठी समिती नेमणूक
  12. ST महामंडळातील जाहिरात परवान्यांमधील गैरव्यवहार
  13. पीसीएनटीडीएच्या आरक्षित जागांवरील ताबेदार नागरिकांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड देणे
  14. गोवंश हत्या व गोमांस वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी
  15. जगताप यांनी कोयता गँग, वाहनांच्या काचा फोडणारी टोळकी, अमलीपदार्थ उत्पादक व विक्रेते, दूध व अन्न भेसळ करणारे माफिया यांना MCOCA अंतर्गत आणण्याची मागणी केली.
  16. झोपडपट्ट्यांमध्ये नियमबाह्य TDR ची काळी बाजारपेठ रोखण्यासाठी पारदर्शी आणि कठोर कायदा व्हावा, असे स्पष्ट मत मांडले.
  17. हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरस्थिती आदी विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेतली.
  18. काळेवाडीतील बेकायदेशीर चर्चवर कारवाई व धर्मांतर विरोधी उपाययोजनांबाबतही मुद्दा मांडला.
  19. शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना
  20. गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा आणि नार्कोटिक्स सेल स्थापन
  21. डिजिटल भारताच्या दिशेने ५० सायबर लॅब्स आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू
  22. नव्या शिक्षण धोरणांतर्गत नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रकल्प
  23. जनसुरक्षा कायद्याबाबत बोलताना, त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कायद्याने पुराव्यांची अट ठेवली जाणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.

   पत्रकार परिषदेस माई ढोरे, सचिन चिंचवडे, संतोष कलाटे, उषा मुंडे, शारदा सोनवणे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, निर्मला कुटे, आरती चोंधे, सुरेश भोईर, अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, संदीप कस्पटे, संतोष कांबळे, संदीप गाडे, विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, महेश जगताप, काळूराम नढे, तानाजी बारणे, भाजप मंडलाध्यक्ष गणेश ढोरे, सनी बारणे, मोहन राऊत, हर्षल नढे, सोमनाथ तापकीर, पियुषा पाटील, रामदास कस्पटे, अतुल पाटील, नरेंद्र माने, दीपक भोंडवे,  सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

READ MORE