निगडी, दि. १० (महाराष्ट्र मंथन):- निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असंख्य अवैध धंद्यांना त्रासलेल्या निगडी परीसारतील शेकडो जागृत नागरिकांनी आज पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना ईमेलवरून वैयक्तिक तक्रार करणारी मोहीम सुरू केली आहे. दिवासभरातच सुमारे ५०० पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे ही तक्रार केवळ पोलिस आयुक्तांनाच करण्यात आली नसून पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांनाही करण्यात आली आहे. आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देवून या सजग आणि अवैध धंद्यांना त्रासलेल्या नागरिकांना दिलासा देणार का याकडे संपूर्ण पिंपरी चिंचवडमधील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
सदर तक्रारीमध्ये निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालीलप्रमाणे अवैध धंदे चालू असल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे.
- बेकायदेशीर स्पा सेंटर्स: अश्लील कृत्ये आणि अनैतिक व्यवसाय (महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१, कलम ३४ चे उल्लंघन). निगडीच्या हद्दीत माझ्या निदर्शनास आलेले ४ स्पा आहेत.
१) जय गणेश व्हिजन, आकुर्डी येथे
२) पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले भक्ती-शक्ती शिल्प समूहाच्या मागे
३) बिजलीनगर ब्रिजकडे जाताना सर्व्हिस रोडवर, काळे मैदान शेजारी
४) थर्मॅक्स चौक जवळ2) अवैध दारू विक्री: टपऱ्यांवर आणि इतर ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री (महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा, १९४९).
१) ओटा स्कीम, संजय हॉटेल, मिलिंद नगर चौक येथे दारूविक्रीची टपरी
२) राहुल नगर, मिलिंद नगर रोडवर दारूविक्रीची टपरी
३) चिकन चौक येथे दारूविक्रीची टपरी
४) वालेचे दुकान जवळ दारूविक्रीची टपरी
3) गुटखा आणि तंबाखू विक्री: बेकायदेशीर गुटखा/तंबाखू विक्री (COTPA, २००३). संपूर्ण निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे २५० टपऱ्या आहेत ज्या गुटखा विकतात, त्यापैकी काही शाळा व कॉलेजच्या जवळ आहेत.
4) गांजा आणि नशाबंदी पदार्थ: गांजा, भांग यांची विक्री (NDPS कायदा, १९८५). पेरूची बाग, काळभोर गोठा परिसरात कित्येक गांजा मिळण्याची ठिकाणे आहेत.
5) हातभट्टी दारू: अवैध दारू विक्री (उत्पादन शुल्क कायद्याचे उल्लंघन). निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ ते ९ ठिकाणी हातभट्टी दारू विकली जाते.
6) लॉजिंग व बोर्डिंग: दुर्गा नगर चौक ते बर्डव्हॅली पर्यंत कित्येक लॉजिंग आहेत, तेथे देहव्यापार चालतो. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जवळच आहे.
7) हॉटेल व ढाबे: वाहतूक नगरमध्ये कित्येक ठिकाणी परवाना नसताना दारू विकली जाते, विशेष म्हणजे ड्राय डे ला देखील.
8) जुगार व मटका: अण्णाभाऊ साठे वसाहत व जिवलग बिल्डिंग जवळ तसेच अंकुश चौक व इतर ठिकाणी लपूनछपून ऑनलाईन द्वारे सट्टा व मटक्याचे व्यवसाय राजरोसपणे चालू आहेत.
पोलीस आयुक्त साहेब, पोलीस उपायुक्त साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब यांचे आदेश असताना देखील निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या अवैध धंद्यांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
यामध्ये पोलीस आयुक्तांनी तात्काळ या अवैध धंद्यांवर कारवाई करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्याची, निगडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तपासाचे आदेश द्यावेत आणि कारवाईचा अहवाल मागविण्याची मागणी नागरिकांनी आयुक्तांना केली आहे तसेच पत्रकारांनी या गंभीर समस्येची जनजागृती करावी आणि समाजहितासाठी आवाज उठविण्याची मागणी केली आहे.











Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0