पिंपरी, दि. ११ (शाफिक शेख) – भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात खेळाडू म्हणून निवड झालेल्या अन्वर मुख्तार अन्सारी व साजिद करीम तांबोळी हे दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट संघाचे नाव नक्कीच उंचावतील आणि पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवर करतील असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक १३ चे भावी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज खान यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहरातील दोन उत्कृष्ट अशा दिव्यांग क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी बजावत संपूर्ण शहराचा अभिमान वाढवला आहे. शहरातील अन्वर मुख्तार अन्सारी व साजिद करीम तांबोळी या दोघांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात खेळाडू म्हणून निवड झाली असून दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया तर्फे 19 नोव्हेंबर रोजी ही निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इम्तियाज खान व उद्योजक दिलीप पवार यांनी या दोन्ही खेळाडूंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला. यावेळी इम्तियाज खान बोलत होते.
तर उद्योजक दिलीप पवार यांनी शुभेच्छा देताना सांगितले, “या दोन्ही खेळाडूंच्यात प्रचंड क्षमता असून ते जागतिक स्तरावर पिंपरी चिंचवडचे नाव गौरवाने अधोरेखित करतील.” दिव्यांग असूनही कठोर परिश्रम, निष्ठा आणि संघर्षातून या खेळाडूंनी साध्य केलेली ही यशस्वी कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.











Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0