निगडी, दि. १९ (महाराष्ट्र मंथन):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या सर्व प्रभागांमध्ये त्या त्या प्रभागाच्या नागरिकांनी त्यांच्या पसंतीचे नगरसेवक निवडून दिले. निवडून दिलेल्या नगरसेवकांचे त्या त्या प्रभागातील लोकांनी सत्कार केले हारतुरे घातले. आता एवढे सर्व होऊन त्या त्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी कामाला केंव्हा सुरू करणार, असा प्रश्न प्रभाग क्रमांक १३ मधील सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
येथील आझाद चौक ते एकता चौक यामधील रस्ता हा रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी दुरवस्था झालेली आहे. मागील तीन वर्षांपासून नगरसेवक नसल्यामुळे येथे प्रचंड दुरवस्था माजली होती. आता नागरिकांनी नवीन नगरसेवक येऊन काम करतील या आशेने आपल्या पसंतीचा नगरसेवक निवडून दिला परंतु त्या नगरसेवकांकडून अद्याप या खड्ड्यांचे दुरुस्ती करण्याबाबत काहीही पावले उचलण्यात येत नाहीये तर नक्की त्या नगरसेवकांचा काम सुरू करण्याचा मुहूर्त केव्हापासून असणार, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.











Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0