बारामती, दि. २८ (शफीक शेख):- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेनेही या अपघाताची माहिती देत असताना अजित पवार यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने अपघातस्थळाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra Deputy CM Ajit Pawar, 3 others on board dead after aircraft crashes in Pune district: Official
— Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026
या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह आणखी सहा जण होते. अपघातानंतर या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
VIDEO | Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar and five other persons were killed after an aircraft carrying them crashed in Pune district. Visuals from spot. pic.twitter.com/XZbDHMhAPa
— Press Trust of India (@PTI_News) January 28, 2026
अजित पवारांचे बारामतीवर विशेष प्रेम होते, त्याच बारामतीमध्ये त्यांना मृत्यू यावा, हे खूप दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दिली आहे.











Users Today : 0
Users Yesterday : 7
Users This Month : 72
Users This Year : 472
Total Users : 42240
Views Today :
Total views : 58520
Who's Online : 0