
पिंपरी चिंचवड, दि. १३ (शफीक शेख):- पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती LPG गॅसचा गैरवापर करून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरला जात असल्याच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांना आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आदेश देत सांगितले आहे की, घरगुती LPG सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस काढून कमर्शियल सिलेंडरमध्ये भरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.
गुरुवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मध्य पूर्वेतील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती LPG सिलेंडरची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घरगुती सिलेंडरमधून कमर्शियल सिलेंडरमध्ये गॅस भरल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच नागरिकांनी पिंपरी-चिंचवड परिसरात कुठेही कमर्शियल LPG सिलेंडरमध्ये बेकायदेशीर गॅस भरण्याचे प्रकार दिसल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
112 (पोलीस कंट्रोल रूम)
020-27352600
020-27352500
9529691966
सध्या पश्चिम आशियातील संघर्षामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक कारखान्यांना कमर्शियल LPG च्या पुरवठ्यात मोठी घट जाणवत आहे. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होत असून अनेक उद्योग अडचणीत सापडले आहेत.











Users Today : 3
Users Yesterday : 37
Users This Month : 95
Users This Year : 668
Total Users : 42436
Views Today : 3
Total views : 59259
Who's Online : 0