सातारा, दि. 10 (महाराष्ट्र मंथन) :- राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपला साताऱ्यात मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान भाजपचे नेते अमित कदम यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला साताऱ्यात मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान कदम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे थेट परिणाम अगामी काळात दिसतील अशी चर्चा सुरू आहे.
अमित कदम यांनी 2017 ला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीत परत आले आहेत. पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण व अर्थ समीती सभापतीपदापर्यंत कदम यांनी मजल मारली आहे. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा-जावळी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.