बारामती, दि. 15 (महाराष्ट्र मंथन) :- बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून आम्ही गेल्या १५ वर्षापासून मागणी करत आहोत परंतु बारामतीचे लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र सरकारने आमच्या मागणीची गंभीरपने दखल न घेतल्याने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व मा. किरणजी घोंगडे साहेब महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष, मा धुराजी शिंदे साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बस स्थानकाचे नामांतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती केले आहे, अशी माहिती रिपब्लिकन सेनेतर्फे देण्यात आली.
यावेळी मा. प्रशांत विष्णू सोनवणे पुणे जिल्हा महासचिव, मा. गणेश मारुती चव्हाण पुणे जिल्हा अध्यक्ष, सौ. कांचन भोसले पुणे जिल्हा युवती अध्यक्षा, मा. उमेश साळवे बारामती तालुका उपाध्यक्ष, मा. हनुमंत बनसोडे इंदापूर तालुका अध्यक्ष व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
