चिंचवड, दि. 08 (शफिक शेख) :- आज महिला दिनाच्या दिवशी जेव्हा सर्व महिला घरी बसून सुट्टी घेवून आनंद साजरा करीत असताना त्यांच्या आनंदात खंड पडू नये म्हणून आजच्या दिवशीही ज्या महिला पोलीस आपल्या कर्तव्यावर दृढ आहेत अशा महिला पोलिसांचे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महिला संपर्क प्रमुख ज्योती शिंदे, अमृता दंडवते आणि संगीता बिरादार यांनी पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले. चिंचवड चौकातील महिला ट्रॅफिक पोलीस वृषाली काळे आणि सौ. वाघमारे यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 90