दौंड पोलिसांची जबरदस्त कामगिरी
दौंड, दि. २३ (महाराष्ट्र मंथन) :- परिसरातील वाहनांची वाट पाहणार्या व्यक्तींना लिफ्ट देण्याचा बहाणा करून आणि शेवटी अज्ञातस्थळी नेऊन लुटणार्या आरोपीस दौंड पोलिसांनी मोठ्या शिताफीने केवळ २४ तासांत जेरबंद केल्याने दौंड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि या धडाकेबाज कामगिरीबद्दल दौंड पोलिसांचे आभार मानले. प्रफुल्ल उर्फ बंटु प्रकाश पानसरे वय वर्षे २८ रा.पाटस ता.दौंड जि. पुणे असे आरोपीचे नाव असून दौंड पोलिस पुढील तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दौंड गावच्या हाती नगर मोरे चौकामध्ये महिला ऋतुजा निलकंठ पुकळे रा. संभाजीनगर,जि. संभाजीनगर हया एस.टी. बसची वाट पाहत असताना एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन येऊन एक अनोळखी इसम सदर महीलेजवळ येऊन कुठे जायचे आहे, अशी विचारणा करून मी नगरला चाललो आहे मी तुम्हाला सोडतो, असे म्हणून कारमध्ये बसवुन मौजे दौंड गावचे हद्दीत असलेले सोनवडी नदीच्या पुलाजवळ कार थांबवुन दमदाटी करून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच बॅग घेऊन तिला रस्त्यावरच अंधारात सोडून पळून गेला.
त्यावेळी लागलीच एक टीम तयार करून अज्ञात वाहनाच्या व आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा प्रफुल्ल उर्फ बंटु प्रकाश पानसरे वय वर्षे २८ रा.पाटस ता.दौंड जि. पुणे याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. डि.बी पथकाने सापळा रचून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह सादर आरोपीस ताब्यात घेऊन दौंड पोलीस स्टेशन गु रं न ५२८/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०९(४), प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेली सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेली कार असे एकूण ५ लाख ५० हजार हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संतोष डोके, मपोसई सुप्रिया दुरंदे, पोहवा सुभाष राउत, नितीन बोराडे, पांडुरंग थोरात, शरद वारे, पोना. अमीर शेख, पोशि. अमोल देवकाते, रवींद्र काळे, योगेश गोलांडे यांनी केली.
