“नवयुग”मुळे निगडी स्मशानभूमी व दफनभूमी परिसरातील नागरिकांच्या जीविताचा धोका टळला

निगडी, दि. १ (महाराष्ट्र मंथन):- या परिसरातील सेक्टर नंबर २२ येथील एकाच ठिकाणी असणार्‍या हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमी ला येण्या जाण्याच्या मार्गावर मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात झाडे धोकादायक पद्धतीने वाढलेली होती. त्यामुळे येथे हिंदू स्मशानभूमि आणि मुस्लिम दफनभूमी मध्ये येणार्‍या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
या प्रकरणाची दखल नवयुग निर्माण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांनी घेतली आणि तत्परतेने पालिकेच्या उद्यान विभागात तक्रार नोंदविली आणि त्याचा पाठपुरावा करून वरील दोन्ही स्मशानभूमि आणि दफनभूमी ला येण्या जाण्याच्या मार्गावरील धोकादायक पद्धतीने वाढलेली फांद्या उद्यान विभागाच्या संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सहाय्याने छाटून येथील नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य केले आहे.

नवयुग निर्माण समितीच्या या कार्यामुळे या परिसरातील आणि इतर नागरिकांमधूनही समाधान आणि आभार व्यक्त होत आहे. सदर कारवाई पालिकेच्या उद्यान विभागाच्या सुपरवाईजर भाऊसाहेब सगरे, मजूर दीपक गायकवाड आणि इतर कर्मचारी यांनी केली.

Leave a Comment

READ MORE