पिंपरी, दि. २७ (महाराष्ट्र मंथन):- केंद्र शासनाच्या महानगरपालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे योजना राबविण्यात येत असुन सदर प्रकल्पाकरिता अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यासाठी दि.२८/०७/२०२३ रोजीपर्यंत जाहीर प्रकटनाद्वारे मुदत देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला इ. कागदपत्रे मिळणेकामी नागरीकांना लागणारा विलंब लक्षात घेता. सदर प्रकल्पांतर्गत नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी दि.१२/०८/२०२३ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे महानगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आले.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 342












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0