गणेश गायकवाड, प्रतिनिधी
अंबरनाथ 27 मार्च : सलमान खानला धमकी आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्या प्रकरणानंतर बिष्णोई गँग चर्चेत आली. यानंतर आता बिष्णोई गँगची ठाणे जिल्ह्यातही एण्ट्री झाली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, याला कारण ठरलं आहे अंबरनाथमधल्या एका ज्वेलरला बिष्णोई गँगच्या नावाने खंडणी मागण्यात आली आहे.
अंबरनाथमधल्या महालक्ष्मी नगर परिसरात असलेल्या देव भैरव ज्वेलर्सचे मालक परबतसिंग चुडवाल यांना बिष्णोई गँगच्या नावाने खंडणी मागत धमकावण्यात आलं. धक्कादायक म्हणजे खंडणी मागणाऱ्याने ज्वेलर्सच्या मालकाला फोन केला, यानंतर मालकाच्या मोबाईलवर स्कॅनर बारकोड पाठवून पैसे पाठवण्याची मागणी केली.
पैसे दिले नाहीत तर मुलाचं अपहरण करून तुझी हत्या करू, अशी धमकीदेखील या गँगने दिली आहे. दरम्यान या प्रकरणी घाबरलेल्या ज्वेलर्सच्या मालकाने अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार दिली आहे. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मोबाईल कॉल ट्रेस करून यासंदर्भात तपास सुरू केला आहे.
परबतसिंग चुडवाल यांना खरंच बिष्णोई गँगने धमकी दिली आहे, का कुणीतरी दुसऱ्यानेच बिष्णोई गँगचं नाव घेऊन धमकी दिली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.












Users Today : 2
Users Yesterday : 3
Users This Month : 206
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today : 7
Total views : 59602
Who's Online : 0