निगडी, दि. १८ (शफिक शेख) :- आपले संपूर्ण जीवन साधे आणि नेहमी दुसऱ्यांचे हित चिंतानामध्ये आणि कशाप्रकारे संपूर्ण जगातील मानव हा सरळमार्गी आणि अल्लाहचा चाहता कशाप्रकारे होईल याच्या मेहनतीमध्ये आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या मुस्लिम तबलीग जमातचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि धर्मगुरू हाफिज मंजूर खान यांचे आज दिनांक १८ मे रोजी अखेर या नश्वर जगाला अखेरचा निरोप देत कधी न संपणाऱ्या अशा जीवनामध्ये प्रवेश केला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मुस्लिम समाजात शोककळा पसरली असून महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक काना कोपऱ्यातून नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. आणि त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी निगडी येथील जन्नतुल बकी येथे हजारोंच्या संख्येने जमा होत आहेत. अंतिम क्रिया रात्री ईशा नमाज नंतर (सुमारे १०.०० ) वाजेपर्यंत जन्नतुल बकी येथे होणार असल्याची माहिती आहे.









