Today’s The Hindu headlines Amit Shah stating “Indian Borders are safe; can’t be violated”. This is a blatant lie or his Himalayan ignorance. Either way he does not deserve to be Home Minister. Or better he work on the illegal dual citizenship of Bambino
— Subramanian Swamy (@Swamy39) April 11, 2023
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांच्याच पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने जोरदार टीका केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमांबाबत केलेल्या विधानावर निशाणा साधला आहे. अमित शहांच्या विधानाचा हवाला देताना एका बातमीच्या मथळ्याचा संदर्भ देत स्वामींनी लिहिले की, “आजच्या हिंदू वृत्तपत्राच्या मथळ्यात अमित शहा म्हणतात की भारतीय सीमा सुरक्षित आहेत, त्यांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. हे उघड खोटे आहे किंवा त्यांचे हिमालयीन अज्ञान आहे. कोणत्याही प्रकारे ते गृहमंत्री होण्याच्या लायकीचे नाही..”
अमित शहा नेमकं काय म्हणाले होते ?
गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी म्हटलंय की, आधी भारताच्या हद्दीत कोणीही घुसखोरी करू शकत होता आणि आता कोणीही त्याच्या सीमेकडे पाहण्याची हिंमत करत नाही. भारताच्या पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशातील किबिथू या सीमावर्ती गावात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचा शुभारंभ करताना शाह म्हणाले की, सैन्य आणि ITBP जवानांचे शौर्य हे सुनिश्चित करते की कोणीही भारताच्या जमिनीचा एक इंचही अतिक्रमण करू शकत नाही.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0