(महाराष्ट्र मंथन)
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवरून भुवया उंचावण्याचं काम केलं. बहुमताच्या बाजूने अजित पवार आले तर मुख्यमंत्री होऊ शकतात. नाहीतर दहा-वीस वर्षे वाट पाहावी लागेल, असं भारतीय जनता पक्षाचे मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. दावा करणे आणि बहुमत असणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण, बहुमताच्या बाजूने ते आले तर मुख्यमंत्री होऊ शकतात, असं दानवे यांनी म्हंटलं.
अजित पवार हे दबंग नेते आहेत. आतापर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्री झाले. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची हुलकावणी मिळाली. २००४ मध्ये काँग्रेसच्या ६९ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७१ जागा निवडून आल्या. त्यावेळी छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजय सिंह मोहिते पाटील आणि अजित पवार शर्यतीत होते. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेता ३ कॅबिनेटची अधिकची मंत्रीपदं आणि महामंडळ घेतली. त्या मोबदल्यात काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर २०२४ मध्ये बघू, असं संजय राऊत म्हणाले. दादांमध्ये क्षमता आहे. आतापर्यंत अनेक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांनी विक्रम केला आहे. पण काही जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. जुगाड करून. तोडफोड करून, असा टोला एकनाथ शिंदे यांना लगावला. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री झालो पाहिजे, असे वाटत असेल तर त्यात गैर काय. १४५ आमदारांच्या बहुमताची आकडा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी लागतो. तो आकडा त्यांच्याकडे असेल, तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री बनावं.












Users Today : 2
Users Yesterday : 3
Users This Month : 206
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today : 7
Total views : 59602
Who's Online : 0