कोकणातला भूमीपुत्र आपल्या हक्काची जमीन वाचवण्यासाठी आक्रोश करतोय. पण सत्तापिपासू सरकारपर्यंत हा आक्रोश कधीच पोहचणार नाही. आज पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्त सोलगाव ग्रामस्थांशी संवाद साधला. या लढयात शिवसेना नेहमी तुमच्यासोबत आहे! pic.twitter.com/QhQsMHVe0d
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 6, 2023
रत्नागिरी(बारसू), दि. ६ (महाराष्ट्र मंथन) :- रिफायनरीला बारसू सोलगावच्या लोकांचा विरोध असेल तर येथे प्रकल्प आणू नका. हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिलाय. बारसू रिफायनरी विरोधात असणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज सोलगाव मधील स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध आहे, असे स्पष्ट केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, जर नाणारला लोकांनी विरोध केला होता, तर बारसूत काय वेगळं करताय हे लोकांना दाखवा. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा हा घाट असल्याचे सांगत उद्वव ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. जर रिफायनरी येथे आणण्यास लोकांचा विरोध असेल तर तर ती आणू नका. रिफायनरी येता कामा नये. जे वादग्रस्त नाहीत ते सगळे प्रकल्प गुजरातला आणि वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत आहेत. हे चालणार नाही. ही हुकूमशाही मोडून काढू. हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू असा इशाराही ठाकरेंनी दिला.
यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यकर्त्यांनी सुपारी घेतली असेल तर तर आम्ही कोकणची सुपारी घेतो. भांडवलदारांची सुपारी घेत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांच्या रिफानरी
विरोधाला पाठिंबा दर्शवला. आम्ही जन की बात करायला आलोय मन की बात करायला नाही, असे म्हणत त्यांनी मोदींनाही टोला लगावला.










