
चिंचवड, दि. 17 (महाराष्ट्र मंथन) :- माझा भाउ विशाल नागु गायकवाड याचा दिनांक 2/12/2022 रोजी चिंचवड येथे खून झाला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल मरीबा कांबळे यांस सोडून बाकी सर्व सहआरोपी यांना पकडले आहे. परंतु एवढे दिवस उलटूनही पोलीस त्या मुख्य आरोपीस पकडण्यात असमर्थता दाखवित आहेत आणि दुसरीकडे सदर आरोपीचे नातेवाईक आणि इतर साथीदार मला आणि माइया कुटुंबियांना वारंवार मारण्याची धमकी देवून तक्रार मागे घेण्यास दबाव टाकत आहेत. यामुळे आमच्या घरातील लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे, तरी मा. पोलीस आयुक्तांनी मला व माइया कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश द्यावेत, अशा शब्दांत मयत विशाल गायकवाड याचा भाउ अर्जुन गायकवाड याने मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे साहेब यांच्याकडे विनंतीअर्जाद्वारे आपली व्यथा मांडली.
याबाबत आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना अर्जुन पुढे म्हणाले की, दिनांक 02/12/2022 रोजी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि. नंबर (FIR) 1058/2022 माझ्या भाऊ विशाल नागू गायकवाड याचा खूनची फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी FIR प्रमाणे आरोपी नामे विशाल मरीबा कांबळे यास सोडून इतर सर्व सह आरोपीस अटक केली होती व आहे. सदरील खुनातील मुख्य आरोपी हा विशाल मरीबा कांबळे हा असून घडलेल्या गुन्ह्यास साधारणपणे पाच ते सहा महिने होऊन सुद्धा आरोपी नावे विशाल उर्फ दाद्या मरीबा कांबळे यास पोलिसांनी अटक केलेली नसून, आम्ही पोलिसांना वेळोवेळी मोहन नगर पोलीस स्टेशन व आयुक्त कार्यालय येथे जाऊन फरार आरोपीचे सध्याचे वास्तव्याचे ठिकाण, आरोपी ज्या गाडीतून फिरत आहे, त्या गाडीचे वर्णन तसेच आरोपीचे ज्या ठिकाणाहून येतो-जातो आणि फिरत असतो असे सर्व ठिकाणी पोलिसांना सांगूनही तपास अधिकारी व पोलीस यांनी फरार आरोपी यास तात्काळ निर्देशनास आणून दिलेल्या ठिकाणी जाऊन आरोपीस अटक केलेले नाही. फिर्यादी यांना उडवा उडवी चे व थातूरमातूर उत्तरे देऊन, आरोपीस पकडणे ऐवजी ‘आमचा तपास चालू आहे. काय करायचे व आरोपीस कसे पकडायचे हे आमचे आम्ही पकडू.’ आशा भाषेत फिर्यादीस व त्याच्या कुटुंबीयास पोलीस व तपास अधिकारी यांच्याकडून असमाधानकार प्रतिसाद मिळत आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी पैकी एकूण चार आरोपी हे एकाच कुटुंबातील असून त्यातील विशाल मरीबा कांबळे हा आरोपी फरार आहे. या सख्या चार भावांना गुन्ह्यातून वगळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून व तपास अधिकाऱ्यांकडून होत आहे. तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना बोलवून हे चार भाऊ गुन्ह्या घडताना घटनास्थळी नसून इतर ठिकाणी, असे सांगून गुन्हा मागे घेण्यास व दिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीमध्ये बदल करण्यास सांगत आहे.
सदरील फिर्यादी आपल्या कुटुंबासमवेत व पाच मुलींचा समावेश असुरक्षित अशा दहशतीच्या वातावरणातून जात आहे. फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबीयांना आरोपी यांच्या घरच्यांकडून फिर्याद मागे घेण्यासाठी दमदाटी करून दबाव आणण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न सातत्याने होत आहेत. हे पोलिसांना व तपास अधिकारी यांना सांगूनही पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली जात नाही. गुन्हास पाच महिने उलटूनही आरोपी नामे विशाल उर्फ दादा मरीबा कांबळे यास अटक केलेले नाही, यावरून पोलीस हे आरोपीस का पकडत नाही? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फरार आरोपीस पकडून तात्काळ अटक करावी व तपास योग्य दिशेने करण्यात यावा. मा. आयुक्तांनी संबंधित तपास अधिका-यांना कुठलाही पक्षपात न करता कारवाई करण्याचे आणि मला व माइया कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात आदेश द्यावेत, अशी विनंती अर्जुन गायकवाड याने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आता आयुक्त साहेब याकडे किती गांभिर्याने लक्ष देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0