
शिरूर, दि. 27 (महाराष्ट्र मंथन) :- राजू प्रल्हाद कांबळे व त्याचे कुटूंबिय यांनी शिरूर येथील शासकीय जमिनीचे अवैधरित्या उत्खनन करुन शासनाचे नुकसान करीत असल्याचे वेळोवेळी सांगून देखील अधिकारी याकडे संशयास्पदरित्या दुर्लक्ष करत आहे. या संदर्भात चंदननगर गावठाण येथील नवनाथ श्रीपती आडागळे यांनी लेखी पत्राद्वारे तहसिलदार, शिरुर जिल्हाधिकारी पुणे यांस व गटविकास अधिकारी शिरूर यांस प्रत्यक्ष या घटनेची तक्रार देऊन उत्खनन ताबडतोब थांबवावे अशी विनंती केली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा चिटणीस राजू चांदणे यांनी सांगितले की, दि. ०७/०९/२०२१ रोजीही तक्रार अर्ज केला होता पण यावर लक्ष दिले नाही. जवळपास दीड वर्ष सतत तक्रारी दिल्या आहेत. मात्र सारे काही पालथ्या घड्यावर पाणी. याबाबतचे तक्रारदार नवनाथ श्रीपती आडागळे, रा. चंदननगर गावठाण, मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे यांचा दिनांक ०७/०९/२०२१ रोजीचा तक्रार अर्ज तहसिलदार, शिरुर महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी पुणे या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.
यावेळी तक्रार अर्जात राजू प्रल्हाद कांबळे व कुटूंबियांनी बेकायदेशीरपणे ग्रमापंचायत हद्दीतील शासकीय जागा बळकविण्यासाठी सदर जागेत श्री. नागवडे यांचा जे. सी. बी. व ट्रॅक्टर लावून बेकायदेशीरपणे उत्खनन करत असलेबाबत नमूद केलेले आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करुन चौकशीअंती तथ्य आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करावी. अन्यथा जिल्हाधिकार्यालय व येथिल रटाळ कार्यपद्धती विरोधात आंदोलन छेडले जाईल, असे यावेळी नवनाथ आडागळे, बायडाबाई पवार, रामदास पवार, सूहास आडागळे यांनी सांगितले.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 17
Total views : 59579
Who's Online : 0