भोसरी, दि. २८ (महाराष्ट्र मंथन) :- सुमारे दीड वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रारीबाबत अद्यापही न्याय न मिळाल्याने हातात झालेल्या पांडू रामू राठोड आणि शीला पांडू राठोड या पती-पत्नीने त्याच तक्रार दिलेल्या भोसरी पोलीस स्टेशन समोर दोन मुले आणि दोन मुलींसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 24 मार्च 2022 रोजी शीला पांडू राठोड यांना त्यांच्या मामाच्या मुलांनी विकी परसराम पवार आणि आकाश परसराम पवार यांनी दांडक्याने डोक्यात मारून डोके फोडल्याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती (एफ आय आर क्रमांक २०८/२०२२ दि. २५/३/२०२२). यामध्ये चुकीच्या पद्धतीने कलम लावल्याचा राठोड दांपत्याचा आरोप आहे त्यास आज रोजी दीड वर्षांचा कालावधी उलटूनही कारवाई झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर शीला यांचे पती पांडू राठोड यांच्याकडून घेतलेले सात लाख पन्नास हजार रुपये परशुराम पवार यांचे कडून परत मागितले असता त्यांचा मुलगा विकी परशुराम पवार यांनी त्याच्या तीन साथीदारांसह पांडुरंग यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच दांडक्याने मारून त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर मारहाण केली. दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी भोसरी पोलीस स्टेशन येथे ( एफ आय आर क्रमांक ९१३/२०२२ दि. १२/११/२०२२) नुसार तक्रार दाखल केली. त्यावरही अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही अनेक वेळा अर्ज करूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याने आणि आम्हाला वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने मी माझी पत्नी माझी दोन मुले आणि दोन मुली आम्ही संपूर्ण कुटुंब त्याच तक्रार दिलेल्या भोसरी पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्या वाचून पर्याय राहिला नसल्याचे राठोड दांपत्याने यावेळी सांगितले.












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 11
Total views : 59573
Who's Online : 0