(शफिक शेख)
चिंचवड, दि. १९ (महाराष्ट्र मंथन):- वळवाच्या पावसापासून बचाव होण्यासाठी वैभवनगर परिसरातील वैभवनगर फेज १ बिल्डिंग मधील बी १ बिल्डिंग शेजारी असलेल्या महावितरणच्या डी. पी. बॉक्सचा आडोसा घेतलेल्या मुक्या जनावरांपैकी एका गाईचा तेथील महावितरणच्या डी. पी. बॉक्सचा करंट लागून नाहक बळी गेला आहे.
महावितरण कंपनीला नागरिकांनी कॉल करून माहिती दिल्यानंतर महावितरण कर्मचारी यांनी येवून येथील वीजपुरवठा बंद करून मृत झालेली गाई बाजूला करून वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला. परंतु प्रत्यक्ष डी.पी. बॉक्सची पाहणी केल्यानंतर डी. पी बॉक्सला करंट लागण्याची कारणे ही केबल शॉर्ट होणे, आर्थिंग नसणे इत्यादी प्रकारची असल्याचे दिसून आले.
मेंटेन्ससाठी लाखो रुपये किमतीची टेंडर काढून सुद्धा पिंपरी परिसरातील कोणतेच डी. पी. बॉक्स सुरक्षित असेल का नसेल यावर खूप मोठी शंका आहे. आज मृत झालेली गाई आहे परंतु उद्या भविष्यात तेथे सर्वसामान्य नागरिकाचा जीव गेल्यावर महावितरण कंपनी – अधिकारी जागे होणार का? संबंधित घटनेला जबाबदार असणारे इंजिनियर व ठेकदार यांच्यावर योग्य ती कारवाई होण्यासाठी येरवडा येथील विद्युत मंडळाचे सुरक्षा अधिकारी यांनी लवकरच कारवाई करावी अशी मागणी यावेळी परिसरातील नागरिकांनी केली.
पिंपरी विभाग महावितरण कंपनी यांच्याकडून पिंपरी परिसरातील डी. पी. बॉक्सच्या मेंटेन्ससाठी किती मुदतीआधी किती कालावधीसाठी ठेकेदारास मेंटेनन्सचे काम दिले होते? किती डी.पी. बॉक्सचे मेंटेनन्स केले आहे? किती रुपये किमतीचे काम होते? तसेच घडलेल्या दुर्घटनेबाबत योग्य ते लेखी मिळावे तसेच जे दोषी अधिकारी व ठेकेदार असतील यांच्यावर गोहत्याचा गुन्हा दाखल का करू नये? असे प्रश्न नागरिक विचारीत आहेत तसेच ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनीही महावितरण पिंपरी विभाग कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे केली आहे.












Users Today : 2
Users Yesterday : 3
Users This Month : 206
Users This Year : 779
Total Users : 42547
Views Today : 7
Total views : 59602
Who's Online : 0