(शफिक शेख)
देहूरोड, दि. ३० (महाराष्ट्र मंथन) : भारत देशाची ओळख ही संविधानामुळे आहे कारण संविधान आहे तर आपण आहोत त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी संविधान आणि संविधानातील मूल्ये जपावीत आणि आज जे कोणी समाजकंटक संविधनाला संपविण्याची भाषा करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन नवयुग निर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष आलमगीर कुरेशी यांनी केले.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व मुस्लिम विकास विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने देहूरोड येथे संविधान सन्मान दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संविधानातील मूल्यांना अनुसरून कार्य करण्याची शपथ घेतली. सामूहिक वाचनादरम्यान करण्यात आला.
यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच यानिमित्ताने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. सभागृहात अॅड. कैलास पानसरे व अॅड. नितीन शील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी समानता, बंधुता, न्याय व स्वातंत्र्य या संविधानिक मूल्यांचे महत्त्व अॅड. नितीन शील यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड आवारातील संविधान प्रास्ताविकेला मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक शेख व नवयुग निर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष आलमगीर कुरेशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नवयुगचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अब्दुल्ला शेख, उपाध्यक्ष बंदेअली सय्यद, के. एच. सूर्यवंशी, हुसेन शेख आदी उपस्थित होते.











Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0