निगडी, दि. ५ (महाराष्ट्र मंथन):- मागील दीड वर्षांपासून निगडी सिग्नल ते चिंचवड स्टेशन मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. या खड्ड्यांमुळे मोठे अनेक अपघात झाले आहे व दिवसेंदिवस या अपघातांमध्ये वाढच होत आहे. ह्या रस्त्यांना डांबरीकरण करून त्वरित दुरुस्त न केल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल अशी भूमिका येथील सर्वसामान्य नागरिकांनी बोलून दाखविली.
महामेट्रोकडे मोठ्या प्रमाणात बजेट असूनसुद्धा ते या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण मंदिर येथिल रस्ता गेले १ वर्ष झाला खोदून ठेवला आहे तिथे पण काहीच काम केले नाही.
या सर्व त्रासामुळे परिसरातील आणि या रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव हातात घेऊन येथून ये – जा करावी लागत आहे. तरी लवकरात लवकर हा रस्ता डांबरीकरण करून दुरुस्त न केल्यास या परिसरातील सर्वसामान्य नागरिक हे रस्त्यावर उतरून निगडी सिग्नल येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील, अशी भूमिका येथील सर्वसामान्य नागरिकांनी घेतली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे नागरिकांच्या या त्रासांकडे आणि त्यांच्या या मागणीकडे कशाप्रकारे पाहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.











Users Today : 6
Users Yesterday : 11
Users This Month : 47
Users This Year : 826
Total Users : 42594
Views Today : 11
Total views : 59751
Who's Online : 0