परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्यांना संपर्क साधण्याचे सांगवी पोलिसांचे आवाहन

सांगवी, दि. २४ (शफीक शेख): गुंतवणुकीवर भरघोस आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित कंपनीत गुंतवणूक केलेल्या इतर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता अंबरीश जोशी (रा. ई १४, अक्षयनगर फेज १, विशालनगर, पिंपळे निलख, पुणे) यांच्या मालकीच्या ‘Clovise Financial Services Proprieatary Firm’ या कंपनीमार्फत नागरिकांना आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेवी व गुंतवणूक स्वीकारण्यात आली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६ (२), ३१८ (४) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये दि. ०४/०६/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

इतर गुंतवणूकदारांनी पुढे येण्याचे आवाहन तपासादरम्यान या कंपनीमध्ये चांगल्या परताव्याच्या आमिषाने आणखी काही नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक केली असण्याची दाट शक्यता समोर आली आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी अद्याप यासंदर्भात तक्रार नोंदवलेली नाही किंवा माहिती दिलेली नाही, त्यांनी तपासात सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित गुंतवणूकदारांनी आपल्याकडील खालील कागदपत्रांसह संपर्क साधावा:

गुंतवणुकीची मूळ/झेरॉक्स पावती

बँक व्यवहारांचा तपशील (Bank Statement)

करारपत्रे (Agreements) व इतर संबंधित कागदपत्रे

 संपर्काचा पत्ता व क्रमांक: सांगवी पोलीस स्टेशन, साई चौक, पी.डब्ल्यू.डी. ग्राऊंड समोर, सांगवी, पुणे.मोबाईल क्रमांक: ८५३०३९७८३२ई-मेल: pssangvi.pcpc-mh@gov.in

Leave a Comment

READ MORE