मान्यवरांच्या उपस्थितीत चिमुरड्या नारायणीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार!

शफीक शेख, महाराष्ट्र मंथन वृत्तसेवा

निगडी, दि. २८ :- लुक्कर परिवारातील चिमुकली नारायणी हिचा पहिला वाढदिवस शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी निगडी येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जाणार आहे.

यमुना नगर येथील दुर्गे चौकात असलेल्या प्रसिद्ध ‘सीझन्स बँकेट्स अँड लॉन्स’ येथे सायंकाळी ७.०० वाजता या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास गुरुवर्य भावेशदादा ननावरे तसेच श्री शिवभक्त गणेशभाऊ मारणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून ते चिमुकलीला शुभ आशीर्वाद देणार आहेत.

या आनंदोत्सवानिमित्त आजी श्रीमती मंगल सुरेश लुक्कर, प्रवीण सुरेश लुक्कर, पूजा प्रवीण लुक्कर तसेच चि. नील प्रवीण लुक्कर यांच्या वतीने सर्व आप्तेष्ट, नातेवाईक आणि स्नेहीजनांना उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Leave a Comment

READ MORE