हिंजवडी पोलिसांची धडक कारवाई; १३ लाख ४५ हजारांचा एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त, दोघांना अटक

महाराष्ट्र मंथन वृत्तसेवा

​वाकड, दि. १६ :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने वाकड परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल १३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा २४९ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन), दोन मोबाईल फोन आणि एक ज्युपिटर दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

​

सविस्तर माहिती अशी की, ​दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी तपास पथकातील सहायक पोलीस फौजदार नरेश बलसाने व पोलीस शिपाई अरुण पारधी यांना बातमीदारामार्फत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, विनोदे कॉर्नर, वाकड येथे एक व्यक्ती एम.डी. हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित विनोदे वस्ती, वाकड येथे सापळा रचला.

​त्यानुसार ​सापळा लावून संशयित इसम प्रमेंद्र सिंह भेरु सिंह (वय ३१ वर्षे, मूळ रा. खुडाला फालना, जि. पाली, राजस्थान) याला दुचाकीसह शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती व वाहनाची तपासणी केली असता:

​१२ लाख ४५ हजार रुपये किमतीचा २४९ ग्रॅम प्रतिबंधित एम.डी. (मेफेड्रॉन) ​दोन मोबाईल फोन ​एक ज्युपिटर मोटारसायकल असा एकूण १३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ​प्रमेंद्र सिंह याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याला मदत करणाऱ्या साथीदार दिनेश कुमार मगाराम चौधरी (वय २८ वर्षे, मूळ रा. खुडाला फालना, जि. पाली, राजस्थान; सध्या रा. फडके हौद चौक, रविवार पेठ, पुणे) यालाही अटक केली. दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करत आहेत.

​सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ​वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिद्धराम म्हेत्रे, तपास पथकाचे प्रभारी सपोनि दुर्गानाथ साळी, सपोनि सोमनाथ पांचाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे व चिंतामण जोशी, सहा. पो. फौजदार नरेश बलसाने, अंमलदार कैलास केंगले, संदीप मासाळ, प्रशांत गिलबिले, विजय गेंगजे, कबीर पिंजारी, नितीन कोहक, प्रवीण पाटील, मिनीनाथ पवार, ओमप्रकाश कांबळे, विशाल भोईर, अजित शिंदे, सुखदेव गावंडे, अरुण पारधी आणि मंगेश लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Comment

READ MORE