पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनिप्रदुषण कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी१६ डॉल्बी सिस्टीमवर कारवाई

पिंपरी, दि. ७ (शफीक शेख):- पिंपरी चिंचवड दहीहंडी उत्सवा दरम्यान ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १६ मंडळांवर कारवाई केल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ०५/०९/२०२६ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये निगडी पोलीस स्टेशन-०४, पिंपरी पोलीस स्टेशन -०१ संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन -०१ दापोडी पोलीस स्टेशन -०१ असे हिंजवडी पोलीस स्टेशन -०१ बावधन पोलीस स्टेशन -०३, वाकड पोलीस स्टेशन -०१, काळेवाडी पोलीस स्टेशन -०१, भोसरी पोलीस स्टेशन -०१ दिघी पोलीस स्टेशन-०१, चाकण दक्षिण पोलीस स्टेशन -०१, असे एकुण -१६ डॉल्बीवर सार्वजनिक दहिहंडी उत्सव दरम्यान सार्वजनिक शांतता व कायदा सुवयवस्था अबाधित राखण्याचे अनुषंगाने पोलीसांनी ध्वनी प्रदुषणास कारणीभुत ठरणा-या डॉल्बी साऊण्ड सिस्टीमवर कारवाई केलेली आहे. कार्यक्रमादरम्यान निर्धारीत ध्वनी मर्यादेपेक्षा मोठया आवाजात डॉल्बी स्टिटीमचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याचे निर्दशनास आले असल्याने, त्यानुसार पोलीसांकडुन तात्काळ सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये १६ डॉल्बी स्पीकर, अॅम्प्ली फायर, मिक्सर व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात आल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पोलीस प्रशासनाकडुन नागरिकांना अवाहन करण्यात आले की, सार्वजनिक शांतता व पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेवुन ध्वनी वर्धक यंत्रणेचा मर्यादीत व नियमबध्द वापर करावा. नियमांचे उल्लंन करणा-यांविरुध्द अशीच कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

पोलीस आयुक्तालयातील ध्वनी प्रदुषनांचे उल्लघन करणारे मंडळावर तसेच डीजे मालक यांच्यावर कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस (गुन्हे), सारंग आवाड, व अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग, बसवराज तेली यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले होते.

Leave a Comment

READ MORE