या व्हिडीओमध्ये एक २५ वर्षीय तरुणीने रस्त्याच्या मधोमध ड्रामा केला आहे. तिचा हा गोंधळ छोटा-मोठा नव्हता, तर तिने अक्षरश: लोकांच्या नाकी नऊ आणले.
वानराने लावले माकडाच्या कानशिलात, पुढे जे घडलं ते… पाहा Video
ही तरुणी रस्त्यात जोरजोराड ओरडताना दिसत आहे. तिने रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिगेट्स पाडले. एवढंच नाही तर एका व्यक्तीकडून त्याची दुचाकी हिस्कावून घेतली आणि त्यावर बसली. एवढंच कमी होतं की काय तर पुढच्या क्षणी ही तरुणी एका कारच्या पुढच्या काचेवर बसलेली दिसत आहे.
ती वाहन चालकाला गाडी चालवू देत नाही आहे. पुढे काही महिलांनी या तरुणीला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण ती तरुणी काही ऐकायला तयार नव्हती. तिने महिलांनाही त्रास दिला, शिवाय कारच्या ड्रायव्हरसमोर तिने दादागिरी केली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला.
या एका तरुणीमुळे संपूर्ण रस्त्यावर ट्राफीक जाम झालं होतं. जो तो या तरुणीचं काय चाललंय या सगळ्याकडे पाहातच राहिला होता.
अखेर त्रासलेल्या लोकांनीपोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणीला पोलीस ठाण्यात नेले. प्रेमात फसवणूक झाल्याचे ती लोकांना सांगत होती असं तेथील एका व्यक्तीने सांगितले. तर मध्येच ती सरकार विरोधात देखील काहीतरी बोलत असल्याचे सांगण्यात आले आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की ती तरुणी मानसिक रुग्ण आहे.
ग्वालियर
युवती का हाइवोल्टेज ड्रामा.
फूल बाग चौराहा पर एक युवती ने किया हंगामा
युवती ने एक घंटे तक हंगामा कर उत्पात मचाया
युवती ने एक कार सवार के साथ मारपीट की
बुजुर्ग की एक्टिवा छुड़ाकर खुद बैठकर चलाने लगी
युवती ने सड़क पर लगे पुलिस के बैरिकेट्स उठा कर फेंक दिए pic.twitter.com/pue5cJdnaQ— Sushil Kaushik (@SushilKaushikMP) March 27, 2023










