चिंचवड, दि. १ (शफीक शेख) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांच्या कडक आदेशांचे अंमलबजावणी करीत खंडणी विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील वाहन चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये दोन वाहन चोर आणि दोन स्क्रॅप विकणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींपैकी सुधीर उर्फ लखन मधुकर कांबळे, वय 33 वर्षे रा. यशोदा बिल्डींग, पाचवा मजला रूम नंबर 513, अजंठानगर, चिंचवड पुणे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडून निगडी पो. स्टे. कडील 2 गुन्हे, चिखली पो. स्टे. कडील 3 गुन्हे, चिंचवड पो. स्टे. कडील 3 गुन्हे, दिघी पो. स्टे. कडील 2 गुन्हे आणि सांगवी पो. स्टे. कडील 1 असे एकुण 4,65,000 रूपये किंमतीची 11 वाहने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना मिळाल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेल्या 11 वाहनांपैकी 2,90,000 रूपयांची 7 दुचाकी हस्तगत केलेली आहेत. तसेच रशीद मन्सुर शेख वय 34 रा. दुर्गानगर झोपडपट्टी, समाधन फुट वेअर जवळ निगडी पुणे आणि अन्वर शफी शेख वय 43 रा. मिलींदनगर, संजय हॉटेलसमोर, बुद्धविहारामागे, निगडी या दोघा स्क्रॅपविक्री करणा-या इसमांकडून चोरलेली 5 वाहने स्क्रॅप करून ती विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. तसेच मयुर सुखदेव हराळ वय 34 रा. सी. पत्राशेड अजंठानगर, चिंचवड पुणे यांस दोन चोरलेली दुचाकी विकत घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपी सुधीर उर्फ लखन मधुकर कांबळे याच्यावर जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह. पो. आयुक्त मनोज लोहीया, मा. डॉ. संजय शिंदे अपर पो. आयुक्त, मा. स्वप्ना गोरे पोलीस उपआयुक्त, मा. डॉ. प्रशांत अमृतकर सहा. पो. आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पो. निरीक्षक अरविंद पवार, सहा. पो. निरीक्षक उ्द्धव खाडे, सहा.पो. उप. निरीक्षक अशोक दुधवणे, अमर राउत, रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे, नागेश माळी यांच्या पथकाने केली.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 19
Total views : 59581
Who's Online : 0