पथविक्रेता सर्वेक्षण नोंदणीसाठी
मे महिन्यापर्यंत मुदतवाढ

पिंपरी, दि. 4 (शफिक शेख) :- पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रातील पथ विक्रेता सर्वेक्षण (विद्यमान पथ विक्रेत्यांसह) सन २०२२-२३ पुर्ण करण्यात आलेले आहे. सदर सर्वेक्षणाचा कालावधी दि. ०१/११/२०२२ ते ३१/१२/२०२२ असा निश्चित करण्यात आला होता. तथापि मनपाचे कार्यक्षेत्र व व्याप्ती विचारात घेता एकही पथ विक्रेता सर्वेक्षणामधून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षणामध्ये नावनोंद न करू शकलेल्या पथ विक्रेत्यांसाठी 2 मे 2023 पर्यंत सर्वेक्षणासाठी नोंद करण्याची मुदतवाढ देण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दि. १०/०१/२०२३ अखेर पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रामध्ये एकूण १८६०३ इतके पथ विक्रेते व्यवसाय करताना समक्ष जागेवर आढळलेले आहेत. सबब या निवेदनाव्दारे कळविण्यात येते की सदर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पथ विक्रेत्यांची प्राथमिक यादी दि.३१/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर प्राथमिक यादी मनपाचे सर्व क्षेत्रिय कार्यालय व भूमि जिंदगी विभाग, २ रा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत याठिकाणी प्रसिध्द करणेत येणार आहे. त्याचप्रमाणे सदरची यादी पिंपरी चिंचवड मनपाच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड मनपाकडून मनपा कार्यक्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना आवाहन करणेत येत आहे.
१. पथ विक्रेत्यांनी यादीमध्ये तपशील तपासणे.
२. सर्वेक्षण होऊनही यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास त्याबाबत प्रभागामध्ये अर्ज करणे.
३. अपुर्ण कागदपत्र असल्यास त्याची पुर्तता प्रभाग कार्यालयामध्ये तात्काळ करणे.
४. जर सर्वेक्षण राहून गेले असल्याने यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास विहित नमुन्यात प्रभागामध्ये अर्ज सादर करणे.

उपरोक्त बाबींची पुर्तता दि. ०२/०५/२०२३ पर्यंत संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये करावी. मुदतीनंतर प्राप्त हरकतींचा, अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही. यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या ज्या पथ विक्रेत्यांनी कागदपत्र सादर केलेली नाहीत, अशा पथ विक्रेत्यांना जोपर्यंत कागदपत्रे सादर केली जाणार नाहीत तोपर्यंत संबंधितांची नोंदणी स्थगित ठेवण्यात येईल, असे पालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment

READ MORE