भोसरी, दि. 5 (शफिक शेख) :- एमआयडीसी भोसरी परिसरातील वाढत्या जबरी चो-यांच्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून कडक कारवाई करण्याचे आदेश मिळताच गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर आणि पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख यांच्या पथकाने ठोस कारवाई करित ट्रॅप लावला आणि सोमा दुर्गप्पा चौधरी, वय 19 वर्षे रा. 786 मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ नेहरूनगर, पिंपरी, पुणे, आदित्य सुरेश कोळी वय 18 वर्षे रा. 786 मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ नेहरूनगर, पिंपरी, पुणे आणि मुदस्सर अहमद सयद, वय 21 वर्षे रा. 420/4018, वल्लभनगर, बॅडमिंटन हॉलजवळ, पिंपरी पुणे यांना अटक केली. चौकशीअंती आरोपींकडून 23 मोबाईल, 2 तोळे सोने, 1 मोटर सायकल व हत्यार असा एकुण 5,15,300 रूपयांचा मुद्देमाल मिळाला.
वरिल आरोपी हे एमआयडीसी भोसरी, सांगवी, वाकड व हिंजवडी भागात पहाटे कामावरून येणा-या जाणा-या कामगारांना तसेच वाटसरूंना एकटे गाठून हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू जबरीने चोरी करीत असल्याने आरोपींनी कबुल केले. नमुद आरोपींना पुढील कारवाई कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र निकाळजे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पो. आयुक्त मनोज लोहिया, अपर पो. आयुक्त संजय शिंदे, पो. उप. आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा. पो. आयुक्त प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि ज्ञानेश्वर काटकर, पो. उपनिरी इम्रान शेख, पो. अं. फारूक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारूती जायभाय, विशाल भोईर यांनी केली.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0