चिंचवड, दि. 7 (शफिक शेख) :- पुणे मुंबई महामार्गावर चिंचवड चौकामध्ये जिथे नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे तेथे तुम्ही केव्हाही जा कधीही नो पार्किंग नसते. अशा प्रकारे नो पार्किंगच्या ठिकाणी बिनधास्त नागरिक गाडया पार्क करून जातात आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. जेव्हापासून हा नो पार्किंगचा बोर्ड तेथे लावण्यात आला आहे. तेव्हा पासून एकदाही तो परिसर मोकळा दिसलेला नाही. विशेष म्हणजे या ना पार्किंगच्या बोर्डाजवळ पिंपरी पोलीस स्थानक आहे. कदाचित येथे पार्क करण्यात आलेल्या गाडया या ‘‘विशेष’’ही असू शकतात त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
ज्यांच्यावर नियमांची अंमलबजावणी आणि नियम तोडल्यावर शिक्षा करण्याची जबाबदारी आहे अशा पोलीस स्थानकाजवळच जर अशा प्रकारे वाहतूक नियमांचे बारा वाजत असतील तर तो सबंध वाहतूक व्यवस्थापनाचाच अपमान आहे. अशा प्रकारे नियमांची मोडतोड झालेली पाहूनच त्याच्या समोरील रस्त्यावरही बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात आणि एकूणच त्या जागेवर असलेल्या बसस्थानकातून ये-जा करणा-या नागरिकांना या मोठा त्रास होत आहे. तरी वाहतूक विभागास केव्हा जाग याचीच नागरिक वाट पाहत आहेत.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 19
Total views : 59581
Who's Online : 0