पिंपरी, दि. ११ (महाराष्ट्र मंथन) :- आम आदमी पार्टीला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाहीर केल्याने संपूर्ण देशात “आप” कार्यकर्त्यांत आनंदाची लहर आली आहे अशी माहिती “आप”चे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली.
जनतेच्या अपेक्षांचे व्हिजन डाक्युमेंट दिल्ली,पंजाब राज्यामध्ये यशस्वीपणे राबवण्यात आम आदमी पक्षाची सरकारे यशस्वी झाली आहेत. दिल्ली, पंजाब, गुजरात, गोवा या चार राज्यात १६१ आमदार व संसदेत १० खासदार आमच्या पक्षाचे आहेत. राष्ट्रीय पक्षासाठी आवश्यक संविधानिक तरतुदीची पूर्तता,जनतेचा विश्वास,सलग १० वर्षे अविरत संघर्ष केंद्र सरकारची दडपशाही सहन करून कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे, त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी दिली आहे.












Users Today : 1
Users Yesterday : 7
Users This Month : 73
Users This Year : 473
Total Users : 42241
Views Today : 1
Total views : 58521
Who's Online : 0