लातूर, दि. 14 (महाराष्ट्र मंथन) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांना अभूतपूर्व पद्धतीने अभिवादन करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर 11 हजार चौरस फूट जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजेच वहयांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ही चित्राकृती साकारताना 18 हजार वहयांचा वापर करण्यात आला आहे. 11 हजार चौरस फूट जागेवर वहयांनी साकारलेली देशातील पहिलीच चित्राकृती आहे, या कलाकृतीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने देखील घेतली आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 99










