पुणे, दि. 14 (शफिक शेख) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला माता रमाई आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात मा. नगरसेवक श्री. सदानंद शेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाले. काँग्रेस मा. नगरसेविका सौ. सुजाता शेट्टी यांच्या सहकार्याने अमर पवार, अलका पवार, जयसिंग पवार, श्याम पवार, वसंत पवार, विकी शेंडगे, नाईक, मोहम्मद शेख, अमोल शेंडगे, सनी आढाव, जयसिंग पवार, कोमल शेंडगे यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आले आहे.
प्रसंगी भारतीय बौद्ध सभेचे अध्यक्ष नितीनजी वाघमारे, महानंदाताई डाळिंबे, बाबा भाई कुरेशी, शामराव पवार उपस्थित होते. संयोजन प्रियदर्शनी महिला मंडळाने केले.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 75










