रायचूर, दि. २० (महाराष्ट्र मंथन) :- आजच्या काळात पैशाच्या हव्यासापोटी माणसापासून हैवान झालेले डॉक्टर आपण पाहिले असतील परंतु त्याच माणसातील देव आपणास पाहायला मिळेल ते कर्नाटक राज्यातील रायचूर येथे. भिंतीवर बसलेली व्यक्ती सामान्य कपडे परिधान करून, अनवाणी पाय, कागदाच्या तुकड्यावर काहीतरी लिहितो ज्याच्या कडे 3 रूपयांचा पेन आहे.
ती व्यक्ती आहे कर्नाटकातील मांदुआ येथील डॉक्टर शंकर गौडार कोलकाता मेडिकल युनिव्हर्सिटी चे गोल्डमेडलस्ट एमबीबीएस, एमडी. त्याच्याकडे स्वत: चा दवाखाना नाही. केबीन तयार करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. एवढा पैसा कुठून आणणार तो शहरापासून लांब दोन खोल्यांच्या घरात राहतो. रूग्ण उपचारासाठी इतके दूर कसे येतील, म्हणून दररोज तो सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत शहरात एका फास्ट फूड रेस्टॉरंटच्या बाहेर बसतो आणि शेकडो गरीब रूग्णांची तपासणी करतो. त्यांचे उत्तम निदान करतो व स्वस्त, जेनेरिक औषधे लिहून देतो.
तो किती शुल्क घेतो याची आपल्याला कल्पना आहे का? तो फक्त ५ रुपये घेते. होय, फक्त ५ रुपये. गोल्डमेडलीस्ट एमडी पदवी असलेले डॉक्टर गरीब रूग्णांकडून फक्त ५ रुपये आकारतात.
आजच्या जगात जिथे डॉक्टर गरीब, सामान्य लोकांना अक्षरशः लुबाडत आहेत. तो अनेकांसाठी देव माणूस आहे.
अशा उदात्त मानवास अभिवादन करावे.












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 8
Total views : 59570
Who's Online : 0